
अमरावती, 05 ऑगस्ट (हिं.स.)
अमरावतीतील बेलोरा विमानतळ परिसरात भला मोठा अजगर आढळल्याने काही काळ खळबळ उडाली. विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून काही अंतरावर असलेल्या झाडामध्ये हा अजगर दडून बसलेला असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले.
सर्पमित्रांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि सुरक्षित पद्धतीने अजगराचे रेस्क्यू केले. कोणतीही जीवितहानी किंवा अनुचित प्रकार घडू न देता अजगराला ताब्यात घेण्यात आले. रेस्क्यूनंतर वन्यजीव संरक्षणाच्या नियमांचे पालन करत अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासातील जंगल परिसरात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
या घटनेमुळे विमानतळ परिसरात काही काळ उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली. वन्यजीव आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता किंवा त्याला इजा करण्याचा प्रयत्न न करता तात्काळ वनविभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी