जळगाव - जागतिक आदिवासी दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी  मेळावा
जळगाव, 05 ऑगस्ट (हिं.स.) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी शासकीय आश्रमशाळा, विष्णापूर ,ता. चोपडा येथे या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचे थेट लाभ वितरण, मार्गदर्श
जळगाव - जागतिक आदिवासी दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी  मेळावा


जळगाव, 05 ऑगस्ट (हिं.स.) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी शासकीय आश्रमशाळा, विष्णापूर ,ता. चोपडा येथे या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचे थेट लाभ वितरण, मार्गदर्शन आणि बचत गटांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांर्तगत विविध शासकीय यंत्रणासुध्दा सहभागी होऊन लाभार्थ्यांना विविध दाखले व इतर कामे तसेच मागदर्शन करणार आहे. तसेच पुढील कालावधीत मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमात सन २०२५-२६ मधील ८ वैयक्तिक महिला लाभार्थी व २३ सामूहिक महिला बचत गटांना शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात येणार आहे. चोपडा तालुक्यातील ५५ महिला बचत गट व सुमारे ५५० महिला प्रतिनिधींच्या उपस्थितीत महिला बचत गट मेळावा आयोजित करण्यात आला असून नव्याने स्थापन झालेल्या बचत गटांचा सत्कार करण्यात येणार आहे.

'उमेद', 'माविम', जिल्हा उद्योग केंद्र, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, जिल्हा अग्रणी बँक व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून विविध योजनांबाबत माहिती, महिला बचत गटांचे आर्थिक व्यवस्थापन, कर्जपुरवठा व डिजिटल बँकिंगबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत विविध दाखले, कागदपत्रे व इतर शासकीय सेवांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कार्यक्रमात रानभाज्या मेळावा, बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन, यशस्वी महिला लाभार्थ्यांच्या यशोगाथा, इयत्ता 10 वी 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांना राघोजी भांगरे गुणगौरव पुरस्कार वितरण तसेच आदर्श आश्रमशाळा, आदर्श वसतीगृह व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत क्षेत्रातील महिला व बचत गटांच्या सदस्यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande