बीड : १० ऑगस्टच्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर परळीत एलईडी जनजागृती व्हॅनचे उद्घाटन
बीड, 05 ऑगस्ट (हिं.स.)।अनुसूचित जाती उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) विरोधात १० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी एलईडी व्हॅनचे उद्घाटन परळी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात करण्यात आले
जनजागृती व्हॅनचे उद्घाटन


बीड, 05 ऑगस्ट (हिं.स.)।अनुसूचित जाती उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) विरोधात १० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी एलईडी व्हॅनचे उद्घाटन परळी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात करण्यात आले.

या एलईडी व्हॅनच्या माध्यमातून अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधातील भूमिका, मोर्चाचे उद्दिष्ट तसेच समाजबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. शहरासह ग्रामीण भागात ही व्हॅन फिरून जनजागृती करणार असल्याची माहिती मिळते आहे.

यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. १० ऑगस्ट रोजी होणारा मोर्चा ऐतिहासिक आणि व्यापक स्वरूपाचा करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande