रत्नागिरी : साडवलीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
रत्नागिरी, 5 ऑगस्ट (हिं.स.) । साडवली-नैदरवाडी (ता. संगमेश्वर) येथील राजेश पर्शराम चव्हाण यांच्या खासगी विहिरीमध्ये बिबट्या पडलेल्या बिबट्याला वन विभागाने जीवदान दिले. बिबट्या विहिरीत पडल्याची घटना आज सकाळी ९ वाजता उघडकीस आली. याबाबत वन विभागाकडून
विहिरीतून बाहेर काढलेला बिबट्या


रत्नागिरी, 5 ऑगस्ट (हिं.स.) । साडवली-नैदरवाडी (ता. संगमेश्वर) येथील राजेश पर्शराम चव्हाण यांच्या खासगी विहिरीमध्ये बिबट्या पडलेल्या बिबट्याला वन विभागाने जीवदान दिले.

बिबट्या विहिरीत पडल्याची घटना आज सकाळी ९ वाजता उघडकीस आली. याबाबत वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवरूखचे परिमंडळ वनअधिकारी सागर गोसावी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्यासह सोबत घेत जागेवर जाऊन पाहणी केली असता, विहीर आयातकृती ५ x १२ फुट लांबी रुंदीची व सुमारे २० फूट खोल असल्याचे दिसून आले. विहिरीत एक बिबट्या पडलेला दिसला. तो विहिरीत कठड्याचा आधार घेऊन पाण्यात पोहत होता. परिस्थितीची पाहणी करून लोखंडी पिंजऱ्याला दोरी बांधून पिंजरा विहिरीत सोडला असता काही क्षणातच बिबट्या पिंजऱ्यामध्ये येऊन सुरक्षित जेरबंद झाला.

त्यानंतर बिबट्याची सहाय्यक आयुक्तस पशुसंवर्धन तालुका लघु चिकित्सालय, देवरूख यांच्याकडून तपासणी करून घेण्यात आली. बिबट्या सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. ही बचाव मोहीम विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड, परिक्षेत्र वन अधिकारी विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सागर गोसावी, वनरक्षक सहयोग कराडे,वनरक्षक आकाश कडुकर, वनरक्षक सूरज तेली, वनरक्षक सुप्रिया काळे, प्राणी मित्र अनुराग आखाडे यांनी केली.

यावेळी पोलीस पाटील व मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांचेही बिबट्याच्या बचावासाठी चांगले सहकार्य लाभले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande