
परभणी, 05 ऑगस्ट (हिं.स.)। सिद्धेश्वर धरणातील जिवंत पाणीसाठा सध्या 21.22 टक्क्यांवर असून बुधवारी (5 ऑगस्ट) धरणातील जिवंत पाणीसाठा 17.181 दलघमी इतका नोंदविण्यात आला आहे.
धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता 250.85 दलघमी असून त्यापैकी मृत पाणीसाठा 169.89 दलघमी आणि जिवंत पाणीसाठा 80.96 दलघमी आहे. सध्या धरणातील एकूण पाणीसाठा 187.071 दलघमी असून पाणीपातळी 410.900 मीटर इतकी आहे. गेल्या 24 तासांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून 0.937 दलघमी आवक झाली असून एकूण आवक 76.738 दलघमी इतकी नोंदविण्यात आली आहे. धरण परिसरात आज 5 मिमी पावसाची नोंद झाली असून यावर्षीचा एकूण पाऊस 476 मिमी झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी 374 मिमी पावसाची नोंद झाली होती. धरणाची इशारा पाणीपातळी 413.005 मीटर, तर धोका पाणीपातळी 414.830 मीटर आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis