छ. संभाजीनगर - एमजीएमसीएच मार्डचे आंदोलन सुरू; २५० निवासी डॉक्टरांचा सहभाग
छत्रपती संभाजीनगर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर शहरात एमजीएमसीएच मार्डचे आंदोलन सुरू झाले असून,२५० निवासी डॉक्टरांचा सहभाग आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स ने रुग्ण सुरक्षा, वैद्यकीय
छ. संभाजीनगर - एमजीएमसीएच मार्डचे आंदोलन सुरू; २५० निवासी डॉक्टरांचा सहभाग


छत्रपती संभाजीनगर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर शहरात एमजीएमसीएच मार्डचे आंदोलन सुरू झाले असून,२५० निवासी डॉक्टरांचा सहभाग आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स ने रुग्ण सुरक्षा, वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता आणि वैद्यकीय नियमनाच्या पारदर्शकतेसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले. सीसीएमपी प्रमाणित बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणीच्या प्रस्तावाला विरोध करत सुमारे २५० निवासी डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले. मात्र आपत्कालीन सेवा, कॅज्युअल्टी, आयसीयू आणि जीवनावश्यक सर्व सेवा पूर्ववत सुरू असल्याचे मर्डने स्पष्ट केले. आंदोलनाचे नेतृत्व डॉ. चैतन्य धवरे, डॉ. शुभम सावळकर, डॉ. स्नेहा गुणाले आणि डॉ. श्रावणी कद्रे यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande