
छत्रपती संभाजीनगर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या आढावा बैठकीत खासदार संदिपान भूमरे यांनी छत्रपती संभाजीनगर व मराठवाड्यातील आरोग्य सुविधांचा मुद्दा ठामपणे मांडला. आयुष्मान भारत योजनेचा विनाअडथळा लाभ, छत्रपती संभाजीनगरात सुसज्ज आयुष रुग्णालय, ग्रामीण भागात आरोग्य सेवा बळकट करणे, मनुष्यबळ व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. यावर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis