प्रस्तावाला गती : खोपोलीत पाणी साठवण प्रकल्पासह अत्याधुनिक मत्स्यव्यवसाय केंद्र उभारणार
रायगड, ५ ऑगस्ट (हिं.स.) : खोपोली नगर परिषद हद्दीतील मत्स्यव्यवसाय विभागाच्या जागेवर पाणी साठवण प्रकल्पासह अत्याधुनिक मत्स्यव्यवसाय केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला गती मिळाली आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखा
Minister Nitesh Rane takes a positive stance; water storage project to be set up in Khopoli.


Minister Nitesh Rane takes a positive stance; water storage project to be set up in Khopoli.


रायगड, ५ ऑगस्ट (हिं.स.) : खोपोली नगर परिषद हद्दीतील मत्स्यव्यवसाय विभागाच्या जागेवर पाणी साठवण प्रकल्पासह अत्याधुनिक मत्स्यव्यवसाय केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला गती मिळाली आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठपुराव्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत प्रस्तावित प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी, उपलब्ध जागेची उपयुक्तता, पाणी साठवण क्षमता, आवश्यक पायाभूत सुविधा तसेच मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी मंत्री नितेश राणे यांनी संबंधित जागेवर पाणी साठवण प्रकल्पासह अत्याधुनिक मत्स्यव्यवसाय केंद्र उभारण्यास सकारात्मक भूमिका दर्शवत संबंधित विभागांना आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले.

प्रस्तावित प्रकल्पामुळे खोपोली शहराची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार असून भविष्यात नागरिकांना अधिक सक्षम व शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे. तसेच आधुनिक मत्स्यव्यवसाय केंद्रामुळे स्थानिक मत्स्यव्यवसायाला चालना मिळून उत्पादनवाढ, आधुनिक सुविधा आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या बैठकीस जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव जयंत बोरकर, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अमगोथू श्रीरंगा नायक, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जवळे, खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रमजी साबळे, नगरसेवक राहुल गायकवाड, नगरसेवक दिनेश थोरवे, खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande