
सोलापूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसकडून करण्यात आल्याचा दावा असलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोहोळ शहर शाखेच्या वतीने बुधवारी निषेध आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करत संबंधित वक्तव्याचा निषेध नोंदविला. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या छायाचित्राला जोडे मारून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुमित पवार, महिला तालुकाध्यक्ष प्रज्ञा बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष सौदागर बाबर, शहर कार्याध्यक्ष साजिद हुडेकरी, सुनील चव्हाण, वैशाली बनसोडे, लतिका बनसोडे, गणेश टेळे, भैय्या सोलांनकर, सोनू पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेले वक्तव्य महिलांचा अवमान करणारे असल्याचा आरोप करत अशा प्रकारच्या वक्तव्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असल्याचे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड