अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिरास बीडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
बीड, 05 ऑगस्ट (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. लाभार्थ्यांची वाढती संख्या आणि नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लक्षात घेऊन शिबिराची मुदत वाढ
अ


बीड, 05 ऑगस्ट (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. लाभार्थ्यांची वाढती संख्या आणि नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लक्षात घेऊन शिबिराची मुदत वाढविण्यात आली असून, आता हे शिबिर दि. ६ व ७ ऑगस्ट २०२६ रोजीही सुरू राहणार आहे.

अमृतावहिनी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांचा फेटा व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी या जनहिताच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत नागरिकांच्या आरोग्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच शिबिरास आवर्जून उपस्थित असलेले पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा देखील सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

नागरिकांच्या भरभरून प्रतिसादामुळे हे महाआरोग्य शिबिर जनतेच्या विश्वासाचे आणि लोकसेवेच्या संकल्पनेचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे याचे मनस्वी समाधान आहे.

याप्रसंगी आष्टी शिरूर पाटोदा तालुक्यामधील महंत,लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि मोठ्या संख्येने लाभार्थी नागरिक- बंधू भगिनी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande