
छत्रपती संभाजीनगर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। पैठण आगारात पर्यावरणपूरक व आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा पाच इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या. या बसांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
या इलेक्ट्रिक बसांमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी व प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे. पैठण शहर आणि तालुक्यातील प्रवास नागरिकांची यामुळे मोठी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. पैठण बस आगारात अधिकाधिक नवनवीन बस उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न केला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून या बस दाखल झाले आहेत.
---------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis