
नंदुरबार, , 05 ऑगस्ट (हिं.स.) केंद्र पुरस्कृत 'आत्मनिर्भर भारत' पॅकेजअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या 'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग'
(PMFME) योजनेअंतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी नंदुरबार जिल्ह्यात लाभार्थ्यांना मार्गदर्शन व
सहाय्य करण्यासाठी 'जिल्हा संसाधन व्यक्ती' (District Resource Person) यांची निवड करण्यात
येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून 17 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज मागविण्यात येत असल्याची
माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, शंकर किरवे यांनी कळविली आहे. राज्य नोडल अधिकारी एजन्सीच्या वतीने जिल्हा स्तरावर सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी लाभार्थ्यांचे अर्ज भरणे, सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करणे, बँकेकडून कर्ज मंजूर करून घेणे
आणि प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीपर्यंत तांत्रिक व प्रशासकीय मार्गदर्शन करण्यासाठी 'जिल्हा संसाधन व्यक्ती'
(DRP) ची नामिका सूची तयार करण्यात येत आहे.
पात्रता व शैक्षणिक अर्हता:
शैक्षणिक अर्हता: कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी.
विशेष प्राधान्य: अन्न तंत्रज्ञान, अन्न अभियांत्रिकी, कृषी किंवा कृषी-संबंधित विषयातील
पदविका/पदवी/पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
पात्र व्यक्ती/संस्था: सेवानिवृत्त शासकीय किंवा बँक अधिकारी, विमा प्रतिनिधी, बँक मित्र,
सल्लागार संस्था, वैयक्तिक व्यावसायिक किंवा अनुभवी सेवा पुरवठादार संस्था 'जिल्हा संसाधन
व्यक्ती' (DRP) म्हणून कार्य करू शकतात.
आवश्यक अनुभव: कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) बनवणे,
बँकेशी पाठपुरावा करून कर्ज मंजूर करून घेणे, एमआयएस (MIS) पोर्टलचा वापर आणि विविध
शासकीय योजनांच्या समन्वयाचा अनुभव असणे बंधनकारक आहे.
अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे:
इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्जासोबत शैक्षणिक कागदपत्रे, अनुभवाचे दाखले, ओळखपत्रे व
बँक पासबुक छायाप्रत सहपत्रित करून आपले प्रस्ताव दिनांक 17 ऑगस्ट 2026 पर्यंत 'जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी कार्यालय, नंदुरबार' येथे सादर करावेत. सदर पदाकरिता योजनेच्या मार्गदर्शक सूचना,
अर्जाचा नमुना, पात्रता, मानधन (परीश्रमीक) आणि इतर अटी व शर्ती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
कार्यालय, नंदुरबार येथे उपलब्ध आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे अधिकृत संकेतस्थळ
www.krishi.maharashtra.gov.in यावरही उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असेही जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी, श्री. किरवे यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर