परळी : दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद
बीड, ५ ऑगस्ट (हिं.स.) : परळी ग्रामीण पोलिसांनी दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आणि अट्टल आरोपीला अटक करत आणखी एक महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक (अंबाजोगाई) तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाख
परळी ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई


बीड, ५ ऑगस्ट (हिं.स.) : परळी ग्रामीण पोलिसांनी दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आणि अट्टल आरोपीला अटक करत आणखी एक महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक (अंबाजोगाई) तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश निमोणे, पोलीस हवालदार पवार (ब.क्र. ९१३) आणि पोलीस अंमलदार धनवडे (ब.क्र. १७८४) यांच्या पथकाने परळी ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३९/२०२५ मधील भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४) अंतर्गत फरार असलेल्या आरोपीला जेरबंद केले.

अलाउद्दीन उर्फ सल्ल्या गफार सय्यद (वय ३०, रा. काळरात्री मंदिर परिसर, भीमनगर, परळी वैजनाथ) हा आरोपी गुन्हा घडल्यानंतर फरार झाला होता. त्याचा सातत्याने शोध सुरू असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शिताफीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

अटकेनंतर आरोपीला परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पागोटे करीत आहेत.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande