अंबाजोगाईच्या राडी आणि वाघाळा उपकेंद्रांना राष्ट्रीय मानांकन
बीड, ५ ऑगस्ट (हिं.स.) : अंबाजोगाई तालुक्यातील राडी आणि वाघाळा येथील आयुष्मान आरोग्य मंदिरांनी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (NQAS) अंतर्गत उल्लेखनीय यश मिळवत देशपातळीवरील गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. राष्ट्रीय आरोग्य संस्था संसाधन केंद्
राष्ट्रीय मानांकन


बीड, ५ ऑगस्ट (हिं.स.) : अंबाजोगाई तालुक्यातील राडी आणि वाघाळा येथील आयुष्मान आरोग्य मंदिरांनी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (NQAS) अंतर्गत उल्लेखनीय यश मिळवत देशपातळीवरील गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. राष्ट्रीय आरोग्य संस्था संसाधन केंद्र (NHSRC) यांनी जाहीर केलेल्या मूल्यांकनानुसार वाघाळा उपकेंद्राने ९५.६१ टक्के, तर राडी उपकेंद्राने ९२.१२ टक्के गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार झालेल्या व्हर्च्युअल मूल्यांकनामध्ये मातृ-बाल आरोग्य सेवा, लसीकरण, स्वच्छता, औषध उपलब्धता, रुग्णांचे समाधान यासह एकूण १२ सेवा पॅकेजेसच्या निकषांवर या दोन्ही उपकेंद्रांनी उच्च दर्जाची सेवा प्रदान केल्याचे सिद्ध झाले.

या यशाबद्दल लातूर परिमंडळाच्या आरोग्य उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड, बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन रहेमान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. सचिन शेकडे, एनक्यूएएसच्या नॅशनल असेसर संजीवनी गव्हाणे आणि डीक्यूएसी बीडच्या जयश्री दराडे यांनी संपूर्ण आरोग्य पथकाचे अभिनंदन केले.

या यशामध्ये राडीचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. किरण लोंढे आणि वाघाळाच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. आशा मरवले यांनी प्रभावी नेतृत्व केले. तसेच अंबाजोगाईचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाबासाहेब लोमटे, धारूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शहाजी लोमटे आणि बर्दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रंगनाथ आदनाक यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाल्याचे सांगण्यात आले.

स्थानिक पातळीवर राडीचे सरपंच प्रशांत गंगणे, वाघाळाचे सरपंच भगत संतोष, माजी सभापती प्रदीप गंगणे तसेच ग्रामपंचायतींचे सहकार्य लाभले.

उपकेंद्रातील आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा कार्यकर्त्या आणि इतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला नवी उभारी मिळाल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले.

दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांना डिसेंबर २०२६ पर्यंत १०० टक्के एनक्यूएएस प्रमाणित करण्याचे उद्दिष्ट आरोग्य प्रशासनाने निश्चित केले असून, त्यादृष्टीने आवश्यक तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande