कर्जत प्रेस असोसिएशनची नवी कार्यकारिणी जाहीर
रायगड, 05 ऑगस्ट (हिं.स.) : कर्जत तालुक्यात पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या कर्जत प्रेस असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, दैनिक सकाळ व दैनिक सागरचे प्रतिनिधी कैलास म्हामले यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण
पत्रकारांच्या प्रश्नांसाठी एकजुटीचा निर्धार; कर्जत प्रेस असोसिएशनची नवी कार्यकारिणी जाहीर


रायगड, 05 ऑगस्ट (हिं.स.) : कर्जत तालुक्यात पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या कर्जत प्रेस असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, दैनिक सकाळ व दैनिक सागरचे प्रतिनिधी कैलास म्हामले यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. पत्रकारांच्या समस्या सोडविणे, संघटनात्मक बळकटी आणि सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविण्यावर नव्या कार्यकारिणीने भर देण्याचा निर्धार व्यक्त केला.

कर्जत-डिकसळ येथील विश्वस्त व ज्येष्ठ पत्रकार संतोष पेरणे, सल्लागार किशोर गायकवाड, दीपक बोराडे आणि दिगंबर चंदने यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष भूषण प्रधान यांची सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली.नव्या कार्यकारिणीत महेश भगत व जगदीश दगडे यांची उपाध्यक्षपदी, संदेश साळुंके यांची कार्याध्यक्षपदी, रामदास माळी यांची सचिवपदी, विजय डेरवणकर यांची सहसचिवपदी निवड झाली. रोशन दगडे यांच्याकडे पुन्हा खजिनदारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, नरेश कोळंबे यांची सहखजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्य म्हणून नितीन पारधी, अभिषेक कांबळे, प्रथमेश कुडेकर, गणेश लोट आणि वसंत कदम यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ऍड. श्रीकृष्ण डुकरे आणि ऍड. कैलास मोरे यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.

यावेळी संघटनेच्या आगामी वर्षभरातील उपक्रमांचा आराखडा जाहीर करण्यात आला. वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, पत्रकारांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा, आरोग्य तपासणी शिबिरे तसेच विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय तालुक्यातील अधिकाधिक पत्रकारांना संघटनेशी जोडून पत्रकारांमध्ये एकोपा वाढविणे, त्यांच्या व्यावसायिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आणि पत्रकारितेचा दर्जा उंचावण्यासाठी संयुक्तपणे काम करण्याचा संकल्प नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande