नांदेडमध्ये उदय सामंत यांच्या उपस्थितीत एसआयआरची आढावा बैठक
नांदेड, 05 ऑगस्ट (हिं.स.)। आज मतदार पुनर्निरीक्षण अभियान (एसआयआर) अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी एसआयआर नोंदणी कामाचा आढावा घेत त्यांनी अ
अ


नांदेड, 05 ऑगस्ट (हिं.स.)। आज मतदार पुनर्निरीक्षण अभियान (एसआयआर) अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी एसआयआर नोंदणी कामाचा आढावा घेत त्यांनी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले.

या बैठकीमध्ये एसआयआर अभियान अधिक प्रभावीपणे राबविणे, प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करणे, बूथ स्तरावरील नियोजन, कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि आगामी कार्यपद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक असणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.या बैठकीस आ. आनंदराव पाटील बोंढारकर, आ. बाबुराव कदम, लोकसभा संपर्कप्रमुख रमाकांत मढवी, माजी आ. शंकरआण्णा धोंडगे, सर्व आघाड्यांचे जिल्हाप्रमुख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande