
लातूर, 05 ऑगस्ट (हिं.स.)। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या “गुंगी गुडिया” या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करत आज लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने ‘जोडो मारो’ आंदोलन करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा आंदोलकांनी तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांविषयी अशा प्रकारची अपमानास्पद भाषा वापरणे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी बाब असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. संबंधित नेत्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल तात्काळ जाहीर माफी मागावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष मकरंद भैय्या सावे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अफसर बाबा शेख, प्रदेश सरचिटणीस व्यंकटजी बेंद्रे, बबन आबा भोसले, मुर्तूजा खान, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष अंकुश नाडे, युवक जिल्हाध्यक्ष लाला सुरवसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis