जालना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राहुल लोणीकर यांची निवड
जालना, 05 ऑगस्ट (हिं.स.)। जालना येथे ‘दि जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया अध्यासी अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) विष्णू रोडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत संचालक मंडळाने र
अ


जालना, 05 ऑगस्ट (हिं.स.)। जालना येथे ‘दि जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ च्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया अध्यासी अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) विष्णू रोडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत संचालक मंडळाने राहुल लोणीकर यांची अध्यक्षपदी तर निर्मला मरकड यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड केली.

सहकार क्षेत्रातील ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड असून, या दोन्ही अनुभवी व अभ्यासू नेतृत्वामुळे जिल्हा बँकेच्या कारभाराला अधिक गती आणि पारदर्शकता मिळेल, यात शंका नाही. शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हे नेतृत्व यशस्वी कामगिरी करेल, हा ठाम विश्वास आहे.

याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा, आमदार बबनराव लोणीकर, आमदार अर्जुन खोतकर, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार अरविंद चव्हाण, जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, माजी जिल्हाध्यक्ष बद्रीभाऊ पठाडे व दि जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ उपस्थित होते.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande