पाऊस थांबला, आता किडींचा धोका! कपाशीवर चुरडा रोग; सोयाबीनवर पाने खाणार्!या अळीचा प्रादूर्भाव
यवतमाळ, 05 ऑगस्ट (हिं.स.) अतिवृष्टीनंतर आता रोगराईमुळे पीक अडचणीत येण्याचा धोका वाढला आहे. दमट वातावरणामुळे कपाशी, सोयाबीन, मूग पिकावर किडीचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यंदा पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी अडचणीत आहेत. जुलै मह
पाऊस थांबला, आता किडींचा धोका! कपाशीवर चुरडा रोग; सोयाबीनवर पाने खाणार्!या अळीचा प्रादूर्भाव


यवतमाळ, 05 ऑगस्ट (हिं.स.)

अतिवृष्टीनंतर आता रोगराईमुळे पीक अडचणीत येण्याचा धोका वाढला आहे. दमट वातावरणामुळे कपाशी, सोयाबीन, मूग पिकावर किडीचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यंदा पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी अडचणीत आहेत. जुलै महिन्याच्या अखेरीस पाऊस झाल्याने समाधानकारक स्थिती आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पावसाची संततधार सुरू होती. आता उन तापायला लागल्याने दमट वातावरण तयार झाले आहे. याचा परिणाम आता पिकांवर होताना दिसत आहे. जास्त पावसामुळे शेतात चिखल झाला होता. परिणामी, पिकांची वाढ खुंटली. यानंतर उघाड होती. यामुळे पिके अडचणीत येण्याचा धोका वर्तविण्यात येत होता. ऐनवेळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवनदान मिळाले. मात्र, आता सोयाबीन, मूग पिकांवर रोगांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. आधी पावसामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी आता पिकांवरील रोगांमुळे संकटात येण्याचा धोका वाढला आहे. पीक रोगराईच्या ‘चक्रव्यूहात’त अडकण्याची भीती वर्तविली जात आहे. शेतकरी एका संकटात असतानाचा आता दुसरे संकट घोंगाऊ लागले आहे. मात्र, शेतकर्!यांनी घाबरून न जाता योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ करीत आहे. पावसामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. सोयाबीन पीक लहान स्थितीत आहे, कापसाची वाढ खुंटली आहे. त्यातच पाऊस गायब झाल्यास वातावरणाचा परिणाम पिकांवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कृषी विभागाचे आवाहन

पिकांवर सद्यस्थितीत रोगराई नसली तरी वातावरणातील बदलामुळे किडीचा प्रादूर्भाव होण्याचा धोका आहे. शेतकर्!यांनी घाबरून न जाता विद्यापीठ शिफारसीत आंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी करणे योग्य राहील. सोयाबीन, मूग पिकांवर केसाळ अळीचा प्रादूर्भाव दिसत असल्यास शेतकर्!यांनी स्पर्शजण कीटकनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande