यवतमाळ: आसेगावदेवी शिवारात आढळले ‘वाघाचे पगमार्क’, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
यवतमाळ 05 ऑगस्ट (हिं.स.)आसेगाव देवी शिवारातील मंगेश नगराळे व शुभम लुणावत यांच्या शेत परिसरात वाघाचे पगमार्क (पावलांचे ठसे) आढळले आहेत. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांत खबरदारीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आसेगावदेवी ग्रामपं
आसेगावदेवी शिवारात आढळले ‘वाघाचे पगमार्क’


यवतमाळ 05 ऑगस्ट (हिं.स.)आसेगाव देवी शिवारातील मंगेश नगराळे व शुभम लुणावत यांच्या शेत परिसरात वाघाचे पगमार्क (पावलांचे ठसे) आढळले आहेत. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांत खबरदारीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर आसेगावदेवी ग्रामपंचायतच्या वतीने सर्व ग्रामस्थ व शेतकèयांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतात जाताना एकटे न जाता समूहाने जावे, पहाटे व संध्याकाळी अनावश्यक शेतात जाणे टाळावे, लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये, असे बजावण्यात आले आहे.

तसेच वाघ अथवा इतर वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्यास किंवा नवीन पगमार्क आढळल्यास त्याच्याजवळ जाण्याचा किंवा छायाचित्र काढण्यासाठी गर्दी करू नये. तत्काळ वनविभाग, ग्रामपंचायत किंवा स्थानिक प्रशासनाला माहिती द्यावी. ग्रामपंचायतने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

-----------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande