रत्नागिरी : खेड येथे १२ ऑगस्टला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
रत्नागिरी, 5 ऑगस्ट (हिं.स.) । जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, बुधवार दि. १२ ऑगस्ट रोजी खेड तालुक्यातील भरणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजग
रत्नागिरी : खेड येथे १२ ऑगस्टला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा


रत्नागिरी, 5 ऑगस्ट (हिं.स.) । जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, बुधवार दि. १२ ऑगस्ट रोजी खेड तालुक्यातील भरणे येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा रोजगार मेळावा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि भरणे येथील तु. बा. कदम महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

मेळावा बुधवाराी सकाळी ११ वाजता महाविद्यालयात सुरू होईल. या प्लेसमेंट ड्राअव्हमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in किंवा https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या पोर्टलवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांची आधीच नोंदणी झाली आहे, त्यांनी आपले प्रोफाअल पोर्टलवर अद्ययावत करून घ्यावे.

प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहताना उमेदवारांनी आपला बायोडाटा आणि इतर सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती सोबत आणणे अनिवार्य आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र आणि गरजू उमेदवारांनी या मेळाव्यात सहभागी होऊन उपलब्ध रोजगार संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द. दी. चव्हाण यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande