मौजे कुशावाडी, ता.देगलूर येथे (जल अंदाजपत्रक) विषयावर विशेष मार्गदर्शन
नांदेड, 05 ऑगस्ट (हिं.स.)। शेतकरी प्रशिक्षण संस्थेत मौजे कुशावाडी, ता.देगलूर येथे (जल अंदाजपत्रक) या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमादरम्यान जल अंदाजपत्रकाचे महत्त्व, उपलब्ध पाण्याचा अतिशय कार्यक्षम वापर आणि शाश्वत जल नियोजन याविष
अ


नांदेड, 05 ऑगस्ट (हिं.स.)।

शेतकरी प्रशिक्षण संस्थेत मौजे कुशावाडी, ता.देगलूर येथे (जल अंदाजपत्रक) या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले

कार्यक्रमादरम्यान जल अंदाजपत्रकाचे महत्त्व, उपलब्ध पाण्याचा अतिशय कार्यक्षम वापर आणि शाश्वत जल नियोजन याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, केवळ तात्विक माहिती न देता सर्व सहभागी शेतकऱ्यांकडून कागदावर प्रत्यक्ष पाण्याचा ताळेबंद (Water Budget) तयार करून घेण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पाण्याची गरज आणि उपलब्धतेचा ताळमेळ स्वतःच्या हाताने समजून घेणे शक्य झाले. तसेच शेतकऱ्यांच्या मनात जल व्यवस्थापनाबाबत असलेल्या विविध शंकांचे व प्रश्नांचे यावेळी तज्ज्ञांमार्फत निरसन करण्यात आले.

त्यानंतर मौजे रामपूर व लिंगणकेरूर येथे सबसॉइलिंग व बीबीएफ (Broad Bed and Furrow), बेड पद्धतीच्या प्रात्यक्षिक प्लॉटची पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान सबसॉइलिंग केलेल्या प्लॉटमध्ये पिकाची वाढ, मातीची भुसभुशीतता व ओलावा साठवण इतर प्लॉटच्या तुलनेत अधिक समाधानकारक आढळून आली. यावरून सबसॉइलिंग तंत्रज्ञानाचे सकारात्मक व उत्कृष्ट परिणाम स्पष्टपणे दिसून आले. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून या तंत्रज्ञानाच्या परिणामकारकतेबाबत चर्चा करण्यात आली.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande