
अमरावती, 05 ऑगस्ट (हिं.स.) । औषध प्रशासनाने शहरातील चौधरी चौकातील झेनिथ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या परीसरातील मेडिकल स्टोअरचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. एका रुग्णाच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीच्या चौकशीत आरोप खरे असल्याचे आढळल्यानंतर अन्न व औषधी प्रशासन विभागाच्यावतीने हरी कारवाई करण्यात आली. यासोबत हॉस्पिटलची नोंदणी रद्दकरण्यासाठी सिव्हिल सर्जन आणि संबंधित वैद्यकीय परिषदेलापत्र पाठवण्याची प्रक्रिया ही एफडीएने सुरू केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हॉस्पिटलच्या अंतर्गत मेडिकल स्टोअर - मधूनच औषधे खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जात होता. तक्रारीत असाही आरोप करण्यात आला होता की, डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकार आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर, अन्न व औषध - प्रशासनाच्या पथकाने ३० जुलै रोजी झेनिथ रुग्णालयाच्या परिसरात छापा टाकला आणि कागदपत्रे व तक्रारींची तपासणी केली. तपासात अनेक महत्त्वपूर्ण तथ्ये समोर आली. त्यानंतर, सोमवार, ३ ऑगस्ट रोजी, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. अनिल माणिकराव यांच्या सूचनेनुसार मेडिकल स्टोअरचा परवाना रद्द करण्यात आला.
रुग्णांवर दबाव टाकण्यात एका डॉक्टरची भूमिका
अधिकाऱ्यांच्या मते, तपासात रुग्णांवर दबाव टाकण्यात एका डॉक्टरची भूमिका असल्याचेही उघड झाले आहे. परिणामी, रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्यासाठी सिव्हिल सर्जन, संबंधित विभाग आणि वैद्यकीय परिषदेला पत्रे पाठवली जात आहेत, जेणेकरून रुग्णालयाच्या नावाने कोणतेही मनमानी किवा बेकायदेशीर कृत्य यापुढे चालू राहू नये.
कोणत्याही दुकानातून औषधे खरेदी करण्याचे स्वातंत्र्य
मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम मुंडे यांच्या कार्यकाळात रुग्णालयाच्या आवारात चालणाऱ्या मेडिकल स्टोअरचा परवाना रद्द करण्याची ही शहरातील पहिलीच घटना आहे. या कारवाईमुळे शहरातील इतर रुग्णालयांमध्ये खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी