अल्पसंख्यांक कल्याण समितीसाठी स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले
जळगाव, 05 ऑगस्ट (हिं.स.) :अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या शासन निर्णयानुसार राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी तसेच स्थानिक अल्पसंख्यांकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी जिल्हास्तरीय अल्पसंख्य
अल्पसंख्यांक कल्याण समितीसाठी स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले


जळगाव, 05 ऑगस्ट (हिं.स.) :अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या शासन निर्णयानुसार राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी तसेच स्थानिक अल्पसंख्यांकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समितीची पुनर्रचना करण्यात येणार आहे.

पंतप्रधानांच्या अल्पसंख्यांक कल्याणासाठीच्या 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समिती कार्यरत राहणार आहे.

या समितीमध्ये जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजासाठी कार्य करणाऱ्या अशासकीय स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात येणार आहे. इच्छुक संस्थांनी यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.

प्रस्तावामध्ये संस्थेचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी, संस्था नोंदणी क्रमांक व वर्ष, अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक, तसेच संस्थेने अल्पसंख्यांक समाजासाठी केलेल्या शैक्षणिक व इतर सामाजिक कार्याचा सविस्तर तपशील नमूद करावा.

इच्छुक संस्थांच्या प्रतिनिधींनी शासन निर्णयातील सूचनांनुसार आपले प्रस्ताव 7 ऑगस्ट 2026 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन समिती, जळगाव येथे सादर करावेत.

अधिक माहितीसाठी जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन समिती, जळगाव यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी भरत साळुंके यांनी कळविले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande