नांदेड - लांडगेवाडी येथील हनुमान मंदिरात आ. चिखलीकर यांच्या हस्ते वृक्षारोपण
नांदेड, 05 ऑगस्ट (हिं.स.)। आज लांडगेवाडी, ता. लोहा येथील श्री हनुमान मंदिर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रसाद पाटील चिखलीकर यांनी वृक्षारोपण केले निसर्गाचे संतुलन राखणे आणि भावी पिढीला स्वच्छ, सुंदर पर्यावरण देणे हे आपले आद्य कर्तव्
अ


नांदेड, 05 ऑगस्ट (हिं.स.)। आज लांडगेवाडी, ता. लोहा येथील श्री हनुमान मंदिर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रसाद पाटील चिखलीकर यांनी वृक्षारोपण केले निसर्गाचे संतुलन राखणे आणि भावी पिढीला स्वच्छ, सुंदर पर्यावरण देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले. हनुमंताच्या आशीर्वादाने लावलेले हे रोपटे उद्या एका डेरेदार वृक्षात रूपांतरित होऊन सर्वांना सावली आणि ऑक्सिजन देईल, हाच ध्यास आहे असे ते म्हणाले.

यावेळी माजी आमदार मोहनराव हंबर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष माधव पावडे, लोहा पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे ढाकणीकर, माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रमुनी मस्के, बाळू बाबर, परमेश्वर मुरकुटे, हनुमान धुळगंडे, खेडकरवाडीचे सरपंच हणमंतराव खेडकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. चला, आपण सर्वांनी मिळून एक झाड लावूया आणि ते जगवूया! हा संदेश त्यांनी दिला.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande