पश्चिम आशियातून 4,052 भारतीय खलाशी सुरक्षितपणे मायदेशी परतले
नवी दिल्ली , 06 ऑगस्ट (हिं.स.)। पश्चिम आशियातील भू-राजकीय संकटाच्या काळात अडकलेल्या 4,052 भारतीय खलाशांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यात आल्याची माहिती केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी बुधवारी दिली. सोनोवाल यां
पश्चिम आशियातून 4,052 भारतीय खलाशी सुरक्षित  मायदेशी परतले


नवी दिल्ली , 06 ऑगस्ट (हिं.स.)। पश्चिम आशियातील भू-राजकीय संकटाच्या काळात अडकलेल्या 4,052 भारतीय खलाशांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यात आल्याची माहिती केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी बुधवारी दिली.

सोनोवाल यांनी बुधवारी बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत पश्चिम आशिया आणि इतर भागांतील भू-राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सागरी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला. याबाबत ‘एक्स’वरील पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, या संकटादरम्यान अडकलेल्या 4,052 भारतीय सागरी कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यात यश आले आहे.

सोनोवाल यांनी सांगितले की, महासंचालक सागरी प्रशासन परत आणलेल्या कर्मचाऱ्यांना पुनर्वसनासाठी मदत, वैद्यकीय सुविधा, समुपदेशन तसेच प्रभावित कुटुंबांशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे काम करत आहे. याशिवाय, मृत खलाशांच्या निकटवर्तीयांना एसडब्ल्यूएफएस (SWFS) विशेष उच्च-जोखीम क्षेत्र योजना अंतर्गत तातडीची 10 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सोनोवाल म्हणाले की, भारतीय खलाशी हे जागतिक स्तरावरील महत्त्वाचे कामगार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande