
- उद्धव ठाकरे यांना बरा म्हणायची वेळ आली
जालना, 06 ऑगस्ट (हिं.स.) - राज्यात सरकारकडून नवीन कट रचण्यात आला आहे. प्रमाणपत्र त्यांनीच द्यायचे आणि त्यांनीच रद्द करायचे. हा कट देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांकडून रचला जात आहे. एकनाथ शिंदे यांचे नाव मी तीन वर्षांत प्रथमच घेत आहे. सरकार मराठ्यांचे कसे वाटोळे करत आहे, हे मी सिद्ध करून दाखवणार आहे. उद्धव ठाकरे यांना बरा म्हणायची वेळ आली आहे. तुमच्या गद्दारीचा डाग आम्ही पुसला. मीडियात जाहीर पणे सांगितलं होतो. जिल्हा परिषदेच्या उमेदवारासाठी आमच्या लेकराचं वाटोळं करत आहात का? यादरम्यानच मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे मी तुमचे सर्व लोकं झोपून टाकीन… पाडून टाकीन, असा गंभीर इशाराच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी सरकारला दिला.
जरांगेंनी पुढे दावा केला की, सरकारने जाणूनबुजून मराठा समाजाचे नुकसान करण्यासाठी नियोजनबद्ध भूमिका घेतली आहे. मी अनेक लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. सरकारने कट रचून मराठ्यांचे पानिपत करण्याचा प्रयत्न केला आहे. 2029 मध्ये तुम्ही आमच्या हातात असाल. एवढा मोठा बदला घेऊ की, तुम्ही आयुष्यात पाहिला नसेल. कांड्यावर मोजण्याइतकेही युती सरकारचे लोक निवडून येणार नाहीत. मला एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा नव्हती. किती दिवस डबल ढोलकी वाजवणार… मी मिंधा नाही, जेलमध्ये सुद्धा जायला घाबरणार नाही.. बावनकुळे फडणवीस यांचा मालक झाला का?
मी खूपच जास्त खुनशी आहे, एकदा जर डोक्यात गेला तर सोडणार नाही. एकनाथ शिंदे यांना वारंवार इशारा देताना मनोज जरांगे पाटील दिसले. मंत्रालयात बसून कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला. भुमरेंसाठी मराठा समाजाच्या पोरांनी जीवाचे रान केले. आमच्या उपकारांची परतफेड करता का? भुमरे मामा तुम्ही सहा नंबरला होते… तुम्ही इतक्या लवकर विसरलात का? सध्या तात्पुरते घ्या आणि नंतर रद्द करा असं बावनकुळे यांनी सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस बोलत नाहीत, याचा अर्थ मुकसंमती आहे. संजय सिरसाठ यांनी का केलं असावं… हा कट एकनाथ शिंदे यांनीच केला, असाही गंभीर आरोप जरांगे यांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी