
नवी दिल्ली , 06 ऑगस्ट (हिं.स.)।आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मेटा आणि मेटा इंडिया यांच्यावर भारतात त्यांचे खाते (अकाउंट) बंदी घातल्याचा आरोप केला आहे. केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर मेटा आणि मेटा इंडियाला टॅग करत यासंदर्भात पोस्ट केली आहे.
केजरीवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “माझे अकाउंट का बंदी घातले आहे? तुमच्या भारतातील कार्यालयात तोंडी चौकशी केल्यानंतर माझे अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आल्याचे समजले आणि ते येथे उपलब्ध नाही. यामागचे कारण काय? तुमच्या कार्यालयातील कोणीही याचे उत्तर देत नाही. बंदी कशी हटवता येईल, हेही सांगितले जात नाही. मी पाठवलेल्या सर्व ई-मेलना केवळ स्वयंचलित सूचना मिळाल्या, मात्र कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. ही अत्यंत वाईट सेवा आहे. आपल्या पंतप्रधानांसमोर इतके झुकू नका, अन्यथा ते भारतात फक्त स्वतःचेच अकाउंट चालवण्याची परवानगी देतील.”
याआधीही केजरीवाल यांनी एका पोस्टमध्ये मोदी सरकारवर निशाणा साधला होता. त्यांनी लिहिले होते, “मोदी सरकारचा नेमका काय प्लॅन आहे? पेट्रोलमध्ये 50 टक्क्यांहून अधिक इथेनॉल मिसळण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सध्या फक्त योग्य वेळेची वाट पाहिली जात आहे. आधी ई0 आणि ई10 वाहनांमध्ये जबरदस्तीने ई20 पेट्रोल वापरायला लावून वाहनांचे नुकसान केले. आता जर तुम्ही ई20 सुसंगत नवे वाहन घेतले, तर काही दिवसांनी त्यातही जबरदस्तीने ई50 पेट्रोल वापरण्यास भाग पाडून त्याचेही नुकसान केले जाईल. सरकार लवकरच डिझेलमध्येही इथेनॉल मिश्रण वाढवणार आहे. त्यामुळे पुढील काही वर्षे नवीन पेट्रोल किंवा डिझेल वाहन खरेदी करणे टाळा.”
दरम्यान, मेटाने बुधवारी भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ काही काळासाठी उपलब्ध नसल्याबद्दल माफी मागितली होती. मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या प्रमोशनल उपक्रमांमुळे तांत्रिक कारणास्तव हा व्हिडिओ भारतात तात्पुरता ब्लॉक झाल्याचे कंपनीने मान्य केले. पंतप्रधानांचा व्हिडिओ अचानक अनुपलब्ध झाल्यानंतर केंद्र सरकारने या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवत मेटाकडे स्पष्टीकरण मागितले होते.
--------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode