अमली पदार्थ तस्करी व अवैध धंद्यामध्ये सहभाग, तब्बल 60 आरोपींचा एसपींनी घेतला क्लास
अमरावती, 07 ऑगस्ट (हिं.स.) ''ऑपरेशन कवच'' अंतर्गत आरोपींचे समुपदेशन गुन्हा पुन्हा न करण्याची ताकीद ग्रामीण भागातील अमली पदार्थांची तस्करी आणि अवैध व्यापार पूर्णपणे रोखण्याच्या उद्देशाने, पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या नेतृत्वाखाली ''ऑपरेशन
अमली पदार्थ तस्करी व अवैध धंद्यामध्ये सहभाग तब्बल 60 आरोपींचा एसपींनी घेतला क्लास


अमरावती, 07 ऑगस्ट (हिं.स.)

'ऑपरेशन कवच' अंतर्गत आरोपींचे समुपदेशन गुन्हा पुन्हा न करण्याची ताकीद

ग्रामीण भागातील अमली पदार्थांची तस्करी आणि अवैध व्यापार पूर्णपणे रोखण्याच्या उद्देशाने, पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या नेतृत्वाखाली 'ऑपरेशन कवच' अंतर्गत एक अनोखा आणि कठोर उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एनडीपीएस कायद्यांतर्गत नोंदवलेल्या प्रकरणांमधील ६० आरोपींना विशेष चौकशी आणि समुपदेशनासाठी पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात बोलावण्यात आले.

या उपक्रमाचा उद्देश केवळ गुन्हेगारांवर कारवाई करणे हाच नाही, तर त्यांना पुन्हा अमली पदार्थांच्या व्यापारात प्रवेश करण्यापासून रोखणे आणि समाजात अमली पदार्थांच्या गैरवापराविरोधात जागरूकता निर्माण करणे हा देखील आहे. विशेष चौकशीदरम्यान, प्रत्येक आरोपीची त्यांच्या सध्याच्या नोकरी, व्यवसाय, उपजीविकेचे साधन आणि दैनंदिन कामांविषयी सविस्तर चौकशी करण्यात आली. सध्या सक्रिय असलेल्या एनडीपीएस गुन्हेगारांशी किंवा अमली पदार्थांच्या तस्करांशी असलेल्या ' त्यांच्या संबंधांविषयीही पोलिसांनी माहिती गोळा केली. अधिकाऱ्यांनी आरोपींना स्पष्टपणे ताकीद दिली की, भविष्यात अमली पदार्थांची खरेदी, विक्री, तस्करी, साठवणूक, अवैध व्यापार किवा सेवन यासंबंधीच्या कोणत्याही गुन्ह्यात ते सहभागी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यांना आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबतही सूचना देण्यात आल्या.

--------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande