
बीड, 07 ऑगस्ट (हिं.स.)।
बीड जिल्हा दौऱ्यावर राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी परळी शहराला भेट दिली. यावेळी त्यांनी संभाजीनगर पोलीस स्टेशन आणि शहर पोलीस स्टेशनची पाहणी करून प्रशासकीय कामकाज, गुन्हे अन्वेषण, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, सुरक्षा व्यवस्था आणि उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला.
दरम्यान, सदानंद दाते यांनी परळी येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन घेतले.
परळी शहराला भेट देणारे ते पहिले पोलीस महासंचालक असल्याची माहिती मिळत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis