बीड : पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी प्रभू वैद्यनाथाचे घेतले दर्शन
बीड, 07 ऑगस्ट (हिं.स.)। राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते दोन दिवसाच्या बीड जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी आज (दि.७)परळी वैजनाथ पोलीस ठाण्याला भेट देऊन आढावा घेतला. त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिरात जाऊन
सदानंद दाते


बीड, 07 ऑगस्ट (हिं.स.)। राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते दोन दिवसाच्या बीड जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी आज (दि.७)परळी वैजनाथ पोलीस ठाण्याला भेट देऊन आढावा घेतला. त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिरात जाऊन त्यांनी मनोभावे दर्शन घेतले.

पोलीस महासंचालक सदानंद दाते हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी सकाळी बीड येथून ते परळी वैजनाथ शहरात दाखल झाले. परळी येथे शहर पोलीस ठाणे व संभाजीनगर पोलीस ठाण्यात पाहणी करून त्यांनी प्रशासकीय आढावा घेतला. त्याचबरोबर नागरिकांच्या शिष्टमंडळांना त्यांनी भेट देऊन निवेदनांचाही स्वीकार केला. त्यानंतर बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील प्रभू वैद्यनाथ मंदिरात दाखल होत त्यांनी प्रभुवैद्यनाथाची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले. मंदिर व परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करून आवश्यक त्या सूचनाही त्यांनी यावेळी पोलीस प्रशासनाला केल्या. वैद्यनाथ देवल कमिटीच्या वतीने सचिव राजेश देशमुख यांनी त्यांचे वैद्यनाथाची प्रतिमा व प्रासादिक उपरणे देऊन सत्कार केला. यावेळी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे उपस्थित होते. यावेळी विश्वस्त नंदकिशोर जाजू, विजयकुमार मेनकुदळे, रघुवीर देशमुख, आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande