उपमुख्यमंत्री पवार यांची आमदार चिखलीकर यांनी घेतली भेट
नांदेड, 16 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची आज मुंबई येथील ''देवगिरी'' या शासकीय निवासस्थानी सस्नेह भेट घेतली. या प्रस
Q


नांदेड, 16 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांची आज मुंबई येथील 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी सस्नेह भेट घेतली.

या प्रसंगी मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामे, नागरिकांचे प्रश्न आणि स्थानिक महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदनाद्वारे तशा मागण्या सादर केल्या.

यावेळी त्यांनी सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत, संबंधित कामांना गती देऊन प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.

यावेळी राज्यसभा खासदार पार्थ पवार, विधान परिषद आ. शिवाजीराव गर्जे, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव पाटील सावळे, सुरेश राठोड, बाळासाहेब पाटील कऱ्हाळे, मिलिंद पवार, संतोष कदम यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande