रेणापूर तहसील कार्यालयावर काँग्रेसचे हलगी आंदोलन
लातूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। रेणापूर तालुक्यात पिके पूर्णपणे वाळून उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने तातडीने रेणापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये
आंदोलन


लातूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। रेणापूर तालुक्यात पिके पूर्णपणे वाळून उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने तातडीने रेणापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये अनुदान द्यावे तसेच २०२५-२६ चा पीकविमा तातडीने द्यावा, या मागणीसाठी रेणापूर तालुका काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर हलगी वाजवत जोरदार आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी याबाबत तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, शासनाने या मागण्यांची गंभीर दखल घेतली नसल्याचा आरोप करत काँग्रेसने संताप व्यक्त केला.पिके वाळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याने अर्धनग्न वेशभूषा धारण करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.शासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून शेतकऱ्यांना मदत केली नाही, तर पुढील काळात रेणापूर तहसील कार्यालयाच्या दालनात ठिय्या आंदोलन करून आत्मदहन करण्याचा इशारा रेणापूर तालुका काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande