परभणी- पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा महिनाभर ‘सेवा सप्ताह’
परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभर विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून ‘सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येणार आ
परभणी- पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा महिनाभर ‘सेवा सप्ताह’


परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभर विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून ‘सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या सेवा सप्ताहात आशीर्वादाचा दिवा, विकसित भारत संकल्प चित्रकला व भाषण स्पर्धा, नमो सेवा गाथा नाट्य सादरीकरण, अंगणवाडी सेविका सन्मान, विकासकामांची रील स्पर्धा, सेवा दीप यात्रा, सेवा सेतू अभियान, रंगोली स्पर्धा, इन्नोव्हेशन चॅलेंज आणि जनसेवा महाअभियान यांसह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, समाजसेवेची भावना दृढ करणे आणि विकसित भारताच्या संकल्पाला बळकटी देणे, हा या उपक्रमांचा उद्देश असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी सेवा सप्ताहातील विविध कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. प्रत्येक बूथ, गाव आणि शहर पातळीवर सेवा, समर्पण व जनकल्याणाच्या भावनेतून हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे. ‘सेवा सप्ताहा’च्या माध्यमातून जनसहभाग वाढवून विविध समाजोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील, असा विश्वास भरोसे यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande