
चंद्रपूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। सावली वनपरिक्षेत्रात गुरे चारावयास घेऊन गेलेल्या गुराख्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी साडेबारा वाजता घडली.
नील सनी पेटगाव येथील रहिवासी असलेले वासुदेव लक्ष्मण वाकुडकर (६८) हा गुराखी सावली वनपरिक्षेत्रामधील उपरी नियत क्षेत्रात गुरे चारावयास घेऊन गेले असता वाघाने हल्ला चढवीत त्यांना ठार केले. सदर घटनेची माहिती प्राप्त होताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा नोंद करून मृतकाचे शव शवविच्छेदन मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव