प्रत्येक योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा- रामकृष्ण वेताळ
अमरावती, 16 सप्टेंबर (हिं.स.)। शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. यादृष्टीने किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी केले. प्रदेश
प्रत्येक योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा


अमरावती, 16 सप्टेंबर (हिं.स.)। शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. यादृष्टीने किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी केले.

प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून अमरावती येथे त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेतली. यादरम्यान झालेल्या तातडीच्या बैठकीत त्यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या योजनांची माहिती दिली. यासोबतच शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी व वीजबिल माफी, यावर सविस्तर मार्गदर्शन करीत माहिती दिली. यासोबतच त्यांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती थेट पोहोचवण्याचे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केले. या बैठकीचे आयोजन किसान मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबल यांनी केले होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, विदर्भ संघटक प्रा. दिनेश सूर्यवंशी, भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रा. नितीन धांडे यांनीही मार्गदर्शन केले. प्रदेश सरचिटणीस रंगनाथ सोळंके, प्रदेश सरचिटणीस संतोष देशमुख, आप्पा पाटील, बाळासाहेब वानखडे, दत्ता पाटील, गजानन काळमेघ, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष माधव अवघड, राजेश गोफणे यांच्यासह किसान मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande