ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.)। इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतिगृह प्रवेशासोबतच वसतिगृह योजनेपासून वंचित विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावि
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ


परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.)।

इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतिगृह प्रवेशासोबतच वसतिगृह योजनेपासून वंचित विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सहायक संचालक रामेश्वर मुंडे यांनी कळविले आहे.

परभणी जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांमध्ये व्यवसायिक व बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी https://www.hmasnew.mahait.org/ संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेश अर्ज दि. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सादर करावेत.

तसेच, आधार व स्वयंम् योजनेंतर्गत नूतनीकरणाचे अर्ज भरण्याबाबत स्वतंत्रपणे सूचना देण्यात येणार आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत केवळ सन २०२६-२७ मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनीच ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक रामेश्वर मुंडे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande