
नाशिक, 16 सप्टेंबर (हिं.स.)। :- नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या शेतक-यांच्या थकीत ऊस पेमेंटवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. पण त्याामध्ये कोणत्याही निर्ण झाला नाही या सर्वांवरती निर्णय घेण्यासाठी आज गुरुवारी पुन्हा बैठकीचा आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
उसाचे गाळप झाले तर साखर विक्रीचे पैसे गेले कुठे, असा थेट सवाल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बैठकीत उपस्थित केला. याबाबत प्रसाद घावटे अँड कंपनीच्या प्रतिनिधीला चांगलेच खडे बोल सुनावले. शेतकऱ्यांनी तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा का दाखल करू नये, असा सवाल करत त्यांना धारेवर धरले. नाशिक साखर कारखान्याचा खंडित झालेला वीजपुरवठा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत पेमेंटसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. यावेळी खा. राजाभाऊ वाजे, खा. भास्कर भगरे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल अँड एनर्जी लिमिटेडने नासाका भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला. परंतु अष्टलक्ष्मी कंपनीने प्रसाद घावटे अँड कंपनीला हा कारखाना सबलीजवर चालविण्यास दिला आहे. त्यामुळे शेतक-यांचे पेमेंट देण्यावरून अष्टलक्ष्मी आणि घावटे कंपनीकडून टोलवाटोलवी सुरू असल्याचे बैठकीत समोर आले. मात्र, कारखाना भाडेतत्त्वावर चालविणा-या संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी बैठकीला उपस्थित नसल्याने अंतिम तोडगा निघू शकला नाही. आम्ही केवळ उसाचे गाळप केले. त्यानंतर साखरेची विक्री अष्टलक्ष्मी कंपनीने केली, असे स्पष्टीकरण घावटे कंपनीच्या प्रतिनिधीने यावेळी देताच खासदार वाजे चांगलेच आक्रमक झाले. खा. वाजे यांनी, अष्टलक्ष्मी आणि तुम्ही दोघे मिळून कोणत्याही परिस्थितीत तोडगा काढा. काहीही करा; परंतु शेतकऱ्यांना पैसे द्या, अशी आक्रमक भूमिका घेतलीया बैठकीला मूळ भाडेधारक उपस्थित नसल्याने खासदार वाजे व खा. भगरे यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकरी व कामगारांचे प्रश्न प्रलंबित ठेवून चालणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI