हिंदी ही सर्वसामान्य लोकांच्या हृदयाची भाषा - डॉ. दिनानाथ फुलवाडकर
परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.)। हिंदी ही केवळ राष्ट्रीय भाषा नसून ती सर्वसामान्य लोकांच्या हृदयाची भाषा आहे, असे प्रतिपादन गंगाखेड येथील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. दिनानाथ फुलवाडकर यांनी केले. जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात
हिंदी ही सर्वसामान्य लोकांच्या हृदयाची भाषा - डॉ. दिनानाथ फुलवाडकर


परभणी, 16 सप्टेंबर (हिं.स.)।

हिंदी ही केवळ राष्ट्रीय भाषा नसून ती सर्वसामान्य लोकांच्या हृदयाची भाषा आहे, असे प्रतिपादन गंगाखेड येथील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. दिनानाथ फुलवाडकर यांनी केले.

जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय हिंदी दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. श्रीधर भोंबे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. फुलवाडकर बोलत होते. पुढे ते म्हणाले की, हिंदी ही जनसामान्यांची भाषा आहे. ही भाषा जेवढ्या जास्त प्रमाणात शिकल्या जाईल तेवढ्या जास्त प्रमाणात ज्ञानाचे भांडार वाढेल. यावेळी त्यांनी त्रिभाषा सूत्र आणि जागतिकीकरणाच्या काळात हिंदी भाषेचे महत्त्वही विशद केले.

यावेळी उपप्राचार्य डॉ. शाम गोरे म्हणाले की, आपल्या देशात हिंदी भाषा बोलणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या भाषेच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवरील व्यवहार सुकर होतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande