नांदेडच्या वडगाव येथे विविध सामाजिक व विकासकामे
नांदेड, १६ सप्टेंबर (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत लोहा तालुक्यातील वडगाव येथे कै. देवराव दाजीबा पाटील काळे यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम व विकासकामांचे आयोजन करण्यात आले
अ


नांदेड, १६ सप्टेंबर (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत लोहा तालुक्यातील वडगाव येथे कै. देवराव दाजीबा पाटील काळे यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम व विकासकामांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतून स्मृतीप्रणामासोबतच समाजसेवा आणि गावाच्या विकासाचा संकल्प करण्यात आला.

कलंबर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कै. देवराव दाजीबा पाटील काळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव येथे सरपंच विनायक पाटील काळे व पंजाबराव काळे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. तपासणीनंतर गरजू नागरिकांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा वार्षिक नियोजन योजनेंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे फीत कापून लोकार्पण करण्यात आले.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यसेवा आणि गावाच्या विकासासाठी उभारण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीच्या लोकार्पणामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे डॉ. सचिन पाटील उमरेकर, लोहा पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे ढाकणीकर, माजी सभापती शंकरराव पाटील ढगे, शंकरराव काळे, सचिन पाटील कपाळे, संजय पाटील हरबळकर, साईनाथ पाटील टर्के, भीमराव लामदाडे, वीरभद्र राजुरे, प्रभाकरराव आढाव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande