
अमरावती, 16 सप्टेंबर (हिं.स.)
श्री गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने गणेशमूर्ती विसर्जनासाठी व्यापक नियोजन केले आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरिकांना त्यांच्या परिसरातच गणेशमूर्तींचे सुरक्षित, सुव्यवस्थित व पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करता यावे, यासाठी २२ ठिकाणी कृत्रिम श्री गणेश विसर्जन टँक/टब उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.शहरात १४ सप्टेंबर २०२६पासून गणेशोत्सव सुरू असून या कालावधीत विविध प्रभागांमध्ये लहान आकाराच्या गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जाते. मुख्य विसर्जन स्थळांवरील गर्दी व ताण कमी करण्याच्या उद्देशाने ही व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील कृत्रिम विसर्जन टँकचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
२२ ठिकाणी कृत्रिम विसर्जन टँक*महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणांमध्ये झोननिहाय पुढील ठिकाणांचा समावेश आहे :
*झोन १ – रामपुरी कॅम्प*अभियंता भवन, शेगाव नाकाशासकीय फार्मसी महाविद्यालयाजवळ, कठोरा नाकाआराधना बिल्डिंग कॉर्नर, रिंग रोडवेलकम पॉईन्ट, नागपूर रोड
*झोन २ – राजापेठसहकार नगर ग्राउंड, पेट्रोल पंपजवळ, कॉटन मार्केट रोडशिवाजी कमर्शियल मार्केट, रविनगर चौकनेहरू मैदान परिसरप्रशांत नगर बगीचामोती नगर बगीचा, मोतीनगर
*झोन ३ – दस्तुरनगरमालटेकडी, मागील गेट जवळवडाळी मनपा उद्यानविद्यापीठ चौक, पुलाजवळप्रथमेश तलाव, बांबू गार्डन रोड
*झोन ४ – बडनेरा*साईनगर, बँक ऑफ बडोदाश्री महाबली हनुमान मंदिर, तापडिया मॉलमागे, जुना सातूर्णा, साईनगरबडनेरा झिरी तलावगोपाल नगर, जिमजवळ, सिपना कॉलेज रोड बडनेरा भगतसिंग चौक, बारीपुरा
*झोन ५ – भाजी बाजारमहाजनपुरा, हनुमान नगरछत्रपती बगीचाजवळ, रविनगरपुसदकर मैदान, बुधवाराबालाजी नगर, पुष्पक कॉलनी, नवग्रह शनी मंदिराजवळ, मनपाचे ओपन स्पेस कंपाउंड
*प्रत्येक ठिकाणी कर्मचारी व स्वच्छता व्यवस्था*कृत्रिम विसर्जन टँकच्या प्रत्येक ठिकाणी संबंधित प्रभागातील दोन कर्मचारी/बिट पथक नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांची नावे व मोबाइल क्रमांक नोंदविण्यात आले असून, स्वास्थ निरीक्षकांमार्फत या व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. कृत्रिम विसर्जन टँक भरल्यास आवश्यकतेनुसार पाणी बदलणे, निर्माल्य व कचरा काढणे यासाठी संबंधित विभाग आणि कंत्राटदाराशी तात्काळ समन्वय साधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. टँकच्या ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी घंटागाडी २५ सप्टेंबर रोजी सकाळपासून गणेश विसर्जन पूर्ण होईपर्यंत उपलब्ध ठेवण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी