शिक्षकांवरील कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन
लातूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील २,०८६ प्राथमिक शिक्षकांची मुख्यालयी वास्तव्य नसल्याच्या कारणावरून एक वेतनवाढ तीन वर्षांसाठी रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट
मागणी


लातूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर व खुलताबाद तालुक्यातील २,०८६ प्राथमिक शिक्षकांची मुख्यालयी वास्तव्य नसल्याच्या कारणावरून एक वेतनवाढ तीन वर्षांसाठी रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम करीत निषेध नोंदविला.

जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दि. ११ सप्टेंबर रोजी संबंधित शिक्षकांवर ही कारवाई केली. मुख्यालयी वास्तव्य करीत असल्याबाबतच्या प्रतिज्ञापत्रासोबत ग्रामसभेचा दाखला जोडण्याचे आदेश दि. ३० जून २०२२ रोजी देण्यात आले होते. या आदेशाची पूर्तता न झाल्याने शिक्षकांना नोटिसा बजावण्यात आल्या. शिक्षकांनी त्यावर खुलासे सादर केले; मात्र प्रशासनाचे समाधान न झाल्याने १,०८६ शिक्षकांवर वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली.

ही कारवाई अन्यायकारक असून शिक्षकांवर अन्याय करणारी असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केला आहे.

या आंदोलनाचे नियोजन शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत भोजने, उपाध्यक्ष रणजित चौधरी, कार्याध्यक्ष भरत पुंड तसेच सर्व तालुकाध्यक्षांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी सक्रीय सहभाग घेतला. शिक्षकांवरील अन्यायकारक कारवाई तात्काळ मागे घ्यावी, शिक्षकांची बाजू समजून घेऊन न्याय्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षक समिती लातूरच्या वतीने करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande