
चांदवड, 16 सप्टेंबर (हिं.स.) : नाशिक- मालेगाव मार्गावर राहुड घाट परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरून जाणाऱ्या क्रेटा कारला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात क्रेटा कारमधील नऊ जण जखमी झाले असून, त्यापैकी काहींना गंभीर तर काहींना किरकोळ दुखापत झाली. याप्रकरणी शकूर खान समशेर खान (वय ५१, रा. चौधरी वाडा, इस्लामपूर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांनी चांदवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ट्रक क्रमांक आरजे १९ जीई ४३१९ वरील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालकाचे नाव व गाव समजले नाही. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपी ट्रकचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्रक हयगयीने व भरधाव वेगात चालवून समोर चालणाऱ्या क्रेटा कारला पाठीमागून जोराची धडक दिली
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI