
आगामी १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान प्री-नॉन इंटरलॉकिंग व नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक
अमरावती, १६ सप्टेंबर (हिं.स.) : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील हडपसर-घोरपडी दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे कार्यान्वयन करण्यासाठी अभियांत्रिकी, सिग्नल व दूरसंचार तसेच ओव्हरहेड उपकरणांची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी पुणे विभागातर्फे पुणे आणि हडपसर यार्ड येथे प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ही कामे १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द करणे, काही गाड्यांचे मार्ग बदलणे, काही गाड्यांचा प्रवास अंशतः समाप्त किंवा अंशतः सुरू करणे, तसेच काही गाड्यांचे परिचालन नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. काही गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.
नागपूर-पुणे एक्स्प्रेस रद्द
गाडी क्रमांक १२१९४ नागपूर-पुणे एक्स्प्रेस ही २ ऑक्टोबर रोजी नागपूर येथून रद्द करण्यात आली आहे.
अमरावती-पुणे एक्स्प्रेस दौंडपर्यंत
गाडी क्रमांक ११०२६ अमरावती-पुणे एक्स्प्रेस १९ आणि २२ सप्टेंबर रोजी पुण्याऐवजी दौंड येथेच प्रवास समाप्त करणार आहे.
तर गाडी क्रमांक ११०२५ पुणे-अमरावती एक्स्प्रेस ३ ऑक्टोबर रोजी पुणे स्थानकाऐवजी दौंड येथून नियोजित वेळेनुसार सुटणार आहे.
हटिया-पुणे एक्स्प्रेसमध्येही बदल
गाडी क्रमांक २२८४६ हटिया-पुणे एक्स्प्रेस २ ऑक्टोबर रोजी दौंड येथेच प्रवास समाप्त करणार आहे.
गाडी क्रमांक २२८४५ पुणे-हटिया एक्स्प्रेस ४ ऑक्टोबर रोजी पुणे स्थानकाऐवजी दौंड येथून सकाळी ११.५२ वाजता सुटणार आहे.
प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी आपल्या गाडीचे सुधारित वेळापत्रक तपासून प्रवासाचे नियोजन करावे, असे रेल्वे प्रशासनाने सूचित केले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी