
रत्नागिरी, 16 सप्टेंबर (हिं.स.) । गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे उत्सव प्रेरणा – रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन, समाजसेवा आणि कोकणची समृद्ध सणसंस्कृती यांचा सकारात्मक संदेश तरुणाईपर्यंत पोहोचविणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना सहभागी होता येणार असून, रीलचा विषय गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सवाशी संबंधित असणे आवश्यक आहे. रीलमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती, समाजसेवा हीच ईश्वरसेवा किंवा कोकणची सणसंस्कृती यापैकी किमान एका विषयाचा सकारात्मक संदेश असावा.
स्पर्धकांनी आपली रील 14 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर २०२६ या कालावधीत इंस्टाग्रामवर अपलोड करावी. रील पोस्ट करताना रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या अधिकृत @rotaryclubofratnagiri या पेजसोबत Collaboration करणे अनिवार्य आहे.स्पर्धेला प्रवेश विनामूल्य असून,स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ५,०००, ३,००० आणि २,००० रुपये तसेच ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेचा निकाल २३ ऑक्टोबर 2026 रोजी जाहीर करण्यात येणार असून, बक्षीस वितरण समारंभ त्याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता जयेश मंगल कार्यालय, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी येथे होणार आहे.अधिक माहितीसाठी संपर्क : 99704 43137 किंवा 9405773527 या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी