
बीड, 17 सप्टेंबर (हिं.स.)।
हैदराबाद गॅझेट संख्येनुसार कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलीडिटी द्यावी लागणार, हैद्राबाद गॅझेट जीआर सुधारीत करून द्या. तुम्ही मराठ्यांना वेड्यात काढू नका. तुमच्या- आमच्या झालेल्या चुका सोडून द्या. हिंदू वाणी, हिंदू वैश्य आणि वैश्य वाणी या तिन्हीही जाती एकच असल्याचा जीआर अलीकडे राज्य सरकारने काढला आहे. तसा जीआर मराठा कुणबी एकच असल्याचा जीआर काढा. या समाजाला एक न्याय आणि आम्हाला एक न्याय का?स्वतंत्रपूर्व काळात मराठा हा कुणबी होता. नजरचुकीने तो आरक्षणात घ्यायचा राहिला, असा उल्लेख वरील जातीचा जीआर काढताना केला, तसा आमच्या जीआरमध्ये टाका, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
मनोज जरांगेंना सरकारने कोणती हमी दिली?
सातारा, कोल्हापूर, पुणे, औंधचं गॅझेट तीन महिन्यांत जीआर काढून लागू करु
हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी सुधारीत जीआर काढू
हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रांना वैधता देणं चालूच राहील
शिंदे समितीस मिळालेल्या 58 लाख नोंदी घटवणार नाही
मराठवाडयातील 4 लोकप्रतिनिधींची रद्द केलेली कुणबी प्रमाणपत्रे वैध करु.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis