रत्नागिरी : कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर
रत्नागिरी, 18 सप्टेंबर (हिं.स.) । येथील कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. स्पर्धेत यंदा प्रथमच चलचित्र आणि आरास-सजावट असे दोन विभाग करण्यात आले होते. चलचित्र विभागात संदीप चंद्रकांत मेस्त्री (सड्येवाडी-जयगड) यांनी साकर
कांचन मालगुंडकर घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल


रत्नागिरी, 18 सप्टेंबर (हिं.स.) । येथील कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. स्पर्धेत यंदा प्रथमच चलचित्र आणि आरास-सजावट असे दोन विभाग करण्यात आले होते. चलचित्र विभागात संदीप चंद्रकांत मेस्त्री (सड्येवाडी-जयगड) यांनी साकरलेल्या श्री स्वामी समर्थ्यांचा दिव्य प्रकटावतार चलचित्र देखाव्याने, तर आरास / सजावट विभागात अनिकेत सूर्यकांत सुपल (सह्याद्रीनगर - नाचणे) यांनी साकरलेल्या बारा ज्योतिर्लिंग सजावटीने प्रथम क्रमांक पटकवला.

रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि राजापूरचे आमदार किरण तथा भैय्याशेठ सामंत यांचे या स्पर्धेला पाठबळ लाभले. स्पर्धेला रत्नागिरी नगर परिषदेचेही सहकार्य लाभले. स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन या स्पर्धेचे काटेकोरपणे परीक्षण केले आणि आज त्वरित निकाल जाहीर केला. कांचन मालगुंडकर, अभिजित नांदगावकर, नरेंद्र पाटील, विजय पाडावे, मुकुंद विलणकर, विजय बासुतकर, ओंकार पाटणकर, शकील गवाणकर, बाळकृष्ण चव्हाण, मंथन मालगुंडकर, अजिंक्य सनगरे, चंद्रहास विलणकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल असा : चलचित्र : प्रथम - संदीप मेस्त्री, सड्येवाडी-जयगड

(श्री स्वामी समर्थ्यांचा दिव्य प्रकटावतार), द्वितीय - मयूर सुरेश भितळे, सोमेश्वर (हिरकणी देखावा), तृतीय - दीपक मेस्त्री, मिरजोळे (भक्त पुंडलिक).

आरास / सजावट : प्रथम - अनिकेत सुफल, सह्याद्रीनगर - नाचणे (बारा ज्योतिर्लिंग), द्वितीय - स्वप्नील ठीक, तिवंडेवाडी-शिरगाव ( ग्रामीण घर -वारली पेंटिंग), तृतीय - अजय पारकर, मावळंगे-गजनेवाडी (दगडावर चित्रकला).

सुबक मूर्तिकार - वैभव लिंगायत (राजेश लिंगायत यांच्या घरचा गणपती), विशेष उल्लेखनीय - चारुदत्त धालवलकर, गावखडी ( संत ज्ञानेश्वरांनी चालवली भिंत)

जीवन कोळवणकर, कुवारबाव (गोकर्ण महाबळेश्वर कथा), साईराज वाडकर, मिरजोळे (शिवाजी महाराज -भवानी तलवार)

घाटकर परिवार, शेडगेवाडी, पावस (अन्नभेसळ समाजप्रबोधन).

उत्तेजनार्थ : साईराज पोटफोडे, जुनी तांबट आळी-रत्नागिरी (पुरातन मंदिर), निखिल साळवी, गावखडी (सुंभ आरास), आग्रे परिवार, पावस (एकवीरा माता मंदिर), संकेत पाटील (रेडियशन दुष्परिणाम)

प्रोत्साहनपर - अथर्व सावंत, नाचणे (बारा ज्योतिर्लिंग), विशाल शिंदे -सोमेश्वर (ग्रामीण वारली पेंटिंग), किशोर जोशी, मिरजोळे (सीताहरण), सागर पुसाळकर, निवखोल (आकर्षक आरास), ओंकार कांबळे, भाटिमिऱ्या (रामसेतू), चैतन्य खेडेकर, बंदर रोड (आकर्षक आरास), दीक्षा रसाळ, वरचीआळी (वारली पेंटिंग), सुरेश सनगरे, परटवणे (वारली पेंटिंग), यश आंब्रे, गावडे आंबेरे (मंदिर देखावा), आध्या शिर्सेकर, भाट्ये (निसर्ग देखावा), ओम तोडणकर, कुर्ली (आकर्षक आरास), सार्थक मुरकर, फणसोप (गोकुळधाम),

महेश सुतार (गावखडी सुतारवाडी).

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande