पंतप्रधान मोदींकडून मीराबाई चानूचे रौप्य पदक पटकावल्याबद्दल अभिनंदन
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर (हिं.स.) । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानूचे भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. मीराबाई चानूबद्दल भारताला अभिमान असून तिचा दृढनिश्चय आणि सातत्य देशाला सदैव प्रेर
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, 23 सप्टेंबर (हिं.स.) । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानूचे भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.

मीराबाई चानूबद्दल भारताला अभिमान असून तिचा दृढनिश्चय आणि सातत्य देशाला सदैव प्रेरणा देत राहील असे सांगून पंतप्रधानांनी तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे की, मीराबाई चानू यांना मिळाले विशेष रौप्यपदक!महिलांच्या 49 किलो वजनी गटातील भारोत्तोलन स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांचा दृढनिश्चय आणि सातत्य देशवासीयांना प्रेरणा देत राहील. भारताला त्यांचा अभिमान आहे. त्यांच्या आगामी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande