दुष्काळाबाबत पुढील दोन दिवसांत जीआर काढणार-मुख्यमंत्री
छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर (हिं.स.) : धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा परिसरातील दुष्काळी परिस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी पिकांची आणि पाणीटंचाईची परिस्थिती जाणून घेतली. दुष्काळी परिस्
अ


छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर (हिं.स.) : धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा परिसरातील दुष्काळी परिस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी पिकांची आणि पाणीटंचाईची परिस्थिती जाणून घेतली.

दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पुढील दोन दिवसांत दुष्काळाबाबत शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. दुष्काळग्रस्त भागात आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शासनाकडून कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

जनावरांसाठी चारा आणि पाण्याची उपलब्धता तसेच दुष्काळाशी संबंधित अन्य आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अडचणी आणि नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या समस्या मांडल्या. परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतल्यानंतर शासन स्तरावर आवश्यक निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande