मतचोरी हा जनतेविरोधातील गुन्हा, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
नवी दिल्ली , 23 सप्टेंबर (हिं.स.)।काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या आरोपांवरून भाजप, आरएसएस आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले की, “मी निवडणूक आयोग आणि त्यातील अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सा
मतचोरी हा जनतेविरोधातील गुन्हा, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप


नवी दिल्ली , 23 सप्टेंबर (हिं.स.)।काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या आरोपांवरून भाजप, आरएसएस आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले की, “मी निवडणूक आयोग आणि त्यातील अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगत आहे. तुम्ही जे करत आहात, ते चुकीचे आहे. हे देशाच्या विरोधात आहे. हे विसरू नका, जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही तुम्हाला पकडू. तुम्ही यातून वाचू शकणार नाही.”

यासोबतच त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “मतचोरी हा भारतातील जनतेविरोधातील गुन्हा आहे. हा आपल्या संविधानावर थेट हल्ला आहे. हे कृत्य करणाऱ्या भाजप, आरएसएस आणि निवडणूक आयोगाने देशद्रोहाचे काम केले आहे. न्याय नक्की मिळेल.”

एका अहवालानुसार, एसआयआरशी (SIR) संबंधित काही निर्णयांवरून मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य दोन निवडणूक आयुक्तांमध्ये मतभेद झाले होते. निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी अनेक निर्णय आणि आदेशांवर आक्षेप नोंदवले होते.अहवालानुसार, नोव्हेंबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत दोन्ही निवडणूक आयुक्तांनी किमान १४ लेखी आक्षेप नोंदवले होते. या आक्षेपांमध्ये एसआयआरसोबतच फॉर्म-६ मधील बदल, मतदार यादीत नावे समाविष्ट करणे आणि वगळणे, मतदारांशी संबंधित निर्णयांविरोधातील अपील तसेच निवडणूकविषयक डेटा मिळवण्यासारख्या मुद्द्यांचा समावेश होता.

अहवालात असेही म्हटले आहे की, काही प्रकरणांमध्ये आपल्याला माहिती न देता किंवा आपली संमती न घेता निर्णय आणि आदेश कसे जारी करण्यात आले, असा प्रश्न दोन्ही निवडणूक आयुक्तांनी उपस्थित केला होता. हे आक्षेप मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यापर्यंतही पोहोचवण्यात आले होते.

दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. आयोगाच्या सूत्रांनुसार, एसआयआरशी संबंधित सर्व निर्णय एकमताने घेण्यात आले असून आयोगामध्ये कोणतेही मतभेद नाहीत.

आयोगाच्या सूत्रांनी बुधवारी सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार तसेच दोन्ही निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांच्या मंजुरीने सर्व निर्णय एकमताने घेण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार, एखाद्या मुद्द्यावर निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांची वैयक्तिक मते वेगवेगळी असू शकतात. मात्र, एसआयआरसह भारतीय निवडणूक आयोगाचे सर्व निर्णय एकमताने घेण्यात आले आहेत आणि त्यावर मुख्य निवडणूक आयुक्त तसेच दोन्ही निवडणूक आयुक्तांची सहमती आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande